श्री विनोद गायकवाड सहसंपादक
कुरकुंभ(दि 29) मधील श्री फिरंगाईमाता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम अंतर्गत कुरकुंभमध्ये दौंड तहसीलदार सन्मानीय अरुण शेलार व नायब तहसीलदार डॉ तुषार बोरकर यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविन्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत कुरकुंभ गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यावेळी दौंड तहसीलदार श्री अरुण शेलार,नायब तहसिलदार डॉ तुषार बोरकर, मंडलअधिकारी-वर्षा दळवी, तलाठी-योगिता कदम,जयश्री सुतार,मानसी मोहटकर,संतोष इडोळे विद्यालयाचे प्राचार्य श्री नानासाहेब भापकर (सर) पर्यवेक्षक एन.डी.खडके सर कोतवाल-संजय गायकवाड तसेच विद्यार्थी, शिक्षक वृंद उपस्थित होते. देशाच्या लोकसभेच्या आणि राज्याच्या विधानसभेच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून ग्रामीण भागातील नागरीकांना मतदान प्रक्रियेची माहीती आणि मतदार जनजागृती केली जात आहे. दौंड चे उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध शाळामध्ये मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती केली जात आहे.