निकालाच्या तारखांमध्ये पुन्हा बदल…..
द महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे
औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, कृषिविज्ञान यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल १६ जूनला सायंकाळी ६ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. २२ ते ३० एप्रिल (पीसीबी) आणि २ ते १६ मे (पीसीएम) दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरात एकूण ३० सत्रात ही परीक्षा पार पडली. यात भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयावरील एकूण ५,१०० प्रश्नांचा समावेश होता. यातील ४७ प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्या सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्याची माहिती सीईटी सेलच्या सूत्रांनी दिली.