द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
दौंड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड ही प्रशाला, नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर घालणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते, अभ्यासाबरोबरच चित्र, शिल्प, काव्य, क्रीडा, नाट्य, नृत्य या विविध शाखांचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून योग्य शिक्षण व मार्गदर्शन हे प्रशालेमध्ये दिले जाते. त्या अनुषंगानेच प्रतिवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्रशालेमध्ये आयोजित करण्यात येतो. सामाजिक बांधिलकी जपत असताना, सुजाण नागरिकाची असणारी कर्तव्यें, तसेच समाजोन्नती साठी प्रत्येकाने स्वतःमध्ये कोणते बदल घडवावेत याचे विवेचन करणाऱ्या संकल्पनेला घेऊन प्रशालेचे प्राचार्य श्री विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनातून “बी द चेंज” या संकल्पनेचे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ नुकतेच पोदार प्रशालेमध्ये उल्हासपूर्ण व मंगलमय वातावरणात पार पडले.
प्रथम कार्यक्रमास लाभलेले मुख्य अतिथी आय.ए.एस. निलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा, श्री अजिंक्य येळे सहाय्यक आयुक्त पिंपरी चिंचवड महानगर पालिका पुणे, डॉ तुषार बोरकर नायब तहसीलदार दौंड, डॉ. श्रीराम पाणझडे उपसंचालक पुणे शिक्षण विभाग, महादेव कासगावडे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी, पोदार एज्युकेशन नेटवर्क पुणे रिजन चे जनरल मॅनेजर मनोज काळे, प्रशालेचे प्राचार्य श्री विशाल जाधव या मान्यवराच्या शुभहस्ते नटराज व सरस्वती देवता पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये प्रशालेने कला, क्रीडा, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या कार्याचा आढावा घेणारा शाळेचा वार्षिक अहवालाचे वाचन प्रशालेचे प्राचार्य यांनी केले. सदर स्नेहसंमेलनामध्ये सामाजिक जडणघडण, सामाजिक बांधिलकी जपणारी व संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या गीतांवर विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक नृत्यविष्काराचे सादरीकरण केले. तसेच सामाजिक जडणघडण व सामाजिक बांधिलकी ही संकल्पना स्पष्ट करणाऱ्या एकांकिकेचे सादरीकरण ही करण्यात आले.सदर स्नेहसंमेलनात प्रशालेच्या बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या मंगलप्रसंगी उत्त्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रवींद्रनाथ टागोर, फिल्ड मार्शल, नंदलाल बोस, सचिन तेंडुलकर, मदर तेरेसा, अब्दुल कलाम, लता मंगेशकर, गिरीश कर्नाड या आदी पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रशालेतील कर्मचारी यांना ही प्रशालेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल , विविध पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रशालेचे शिक्षक महेश मोरे,पूजा दासारी ,संजय मोरे, सुनील कापडी, ऐश्वर्या कुलथे यांना प्रशालेच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्यात आला . तसेच प्रशालेच्या ऍडमिन विभागातून उत्कृष्ट कामगिरी करिता ‘बेस्ट ऍडमिन’ हा पुरस्कार शिवाली पवार व सारिका कोंडलकर यांना देण्यात आला तसेच ‘बेस्ट सिक्युरिटी’ हा पुरस्कार संतोष सोनवणे यांना तर ‘बेस्ट हाउस किपिंग’ हा पुरस्कार सुनंदा कांबळे व ऍडमिन ट्रान्सपोर्ट स्टाफ तेजस्विनी मोरे यांना प्राप्त झाला. पुरस्कार प्राप्त सर्व पुरस्कारार्थी यांचा उपस्थित अतिथी मान्यवर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना प्रमुख अतिथी यांनी पोदार प्रशाला ही विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वावं देणारी देशातील उत्कृष्ट शाळा आहे असे प्रतिपादन करत शाळेने संपादन केलेल्या यशाचेही कौतुक केले. विद्यार्थ्यांनी नेहमी कार्यशील, अभ्यासु व कलात्मक राहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या वरिष्ट शिक्षिका पूनम जाधव व शिक्षिका सोनू पवार यांनी केले. व आभार शिक्षिका भाग्यश्री झोंड यांनी केले.यावेळी प्रशालेचे विद्यार्थी पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते