द महाराष्ट्र न्युज टीम भिगवण
पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त राज्यभर भक्तीमय वातावरण आहे याचे औचित्य साधुन श्री सदगुरु शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय मंडळाचे पिंटूनाना कोकाटे बालविद्यालयात आषाढी एकादशी दिंडी सोहळा आयोजित केला होता तो अतिशय उत्साहात पार पडला यावेळी बालविद्यालयातील चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना अशी अवस्था होऊन शैक्षणिक वातावरण अत्यंत प्रसन्न होऊन गेले या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विठोबा-रुक्मिणीची वेशभूषा तसेच अभंग व भक्ती गिते यांचे गायन करून उपस्थित सर्व भाविक व पालक यांना मंत्रमुग्ध केले. पंढरपूर म्हटले की वारकरी संप्रदाय जिथे ना कोणता धर्म ना कोणती जात म्हणून आजपर्यंत हा संप्रदाय टिकून आहे हीच शिकवण संस्कार आपल्या विद्यार्थ्यांना देखील असावे म्हणून पिंटू नाना कोकाटे बालविद्यालयात श्री माऊली कोकाटे सर नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यासाठी प्रयत्नशील असतात व त्यासाठी पालक व ग्रामस्थ यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते