वासुंदे:पाटस-बारामती पालखी मार्गावर वासुंदे (ता.दौंड) हद्दीत घडलेल्या बॅंकेचे वसुली एजंट प्रविण मळेकर खुन प्रकरणातील आरोपीचा शोध लावण्यात दौंड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.मात्र,तपासात आरोपीकडुन खुनाचे मिळालेले धक्कादायक कारण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.रस्त्याने जाणाऱ्या वाहनांच्या आवाजाचा त्रास होतोय म्हणुन आरोपीने अनओळखी दुचाकीस्वाराला अडवुन त्याचा खुन केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे दिपक रामदास लोंढे (वय ३७) रा.वासुंदे ता.दौंड जि.पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे येथील प्रविण मळेकर हे बॅंकेचे खासगी वसुली एजंटचे काम करत होते.ते बारामतीला एका बॅंकेचे वसुली नोटीस देण्यासाठी गेले होते.दिवसभर काम ओटोपल्या नंतर सायंकाळी ते बारामती-पाटस पालखी मार्गाने पुण्याकडे निघाले होते.रात्री पावणे आठच्या सुमारास ते वासुंदे हद्दीत येताच कोणीतरी व्यक्तीने त्यांच्या पोटात धारदार सुरा भोकसला.मळेकर यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने तपासाची सुत्र हलविले.यावेळी परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यानुसार पोलिसांनी श्वान पथकही पाचारण केले.तसेच स्थानिक चौकशीत परीसरातील एका जणाकडुन रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर अनेकदा दगड फेकीचा प्रकार घडल्याची माहीती पोलिसांना मिळाली.काही तासात संशयीत आरोपी दिपक लोंढे यास ताब्यात घेतले.पोलिस चौकशीत आरोपीकडुन खुनाचे धक्कादायक कारण समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या वाहनांचा त्रास होतो म्हणुन आरोपी दिपक लोंढे याने कृत्य केले. रस्त्याने जाणाऱ्या मळेकर यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केला.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.लोंढे यावर यापुर्वीही एका महीलेला शस्त्राचा धाक दाखविल्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक संजय जाधव,दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे यांच्यासह आदी पोलिस पथकाने ही कामगिरी केली.