द महाराष्ट्र न्युज टीम शिरूर
दि.8 नागरगाव (तालुका शिरूर) येथील श्री एकनाथ शेलार यांची भाजप युवा मोर्चा शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड झाली शिरूर हवेली विधानसभेचे प्रचार प्रमुख सन्मानीय श्री प्रदीप कंद जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री राहुल पाचर्णे भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष श्री आबासाहेब सोनवणे, भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री संदीप सातव यांच्या हस्ते श्री एकनाथ शेलार यांना नियुक्तीचे पत्र दिले यापूर्वी श्री शेलार यांनी नागरगाव ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे यावेळी सचिन मचाले, रोहित खैरे, सरपंच सचिन पलांडे संचालक माऊली पाटोळे आदी उपस्थित होते त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे