Search
Close this search box.

Follow Us

“जागतिक महिला दिनानिमित्त” दौंडमध्ये ‘मतदार जागृती आणि मतदान सहभाग कार्यक्रम’

उपविभागीय अधिकारी श्री मिनाज मुल्ला, तहसीलदार श्री अरुण शेलार व नायब तहसीलदार डॉ तुषार बोरकर यांच्या उपस्थितीमध्ये ‘दौंड तालुक्यातील महिलांचा सन्मान’

द महाराष्ट्र न्युज टीम दौंड

(दि.8) 35-बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 199- दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक 8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ मतदार जागृती आणि मतदान सहभाग कार्यक्रम अंतर्गत तहसील कार्यालय दौंड येथे तालुक्यातील महिलांचा सन्मान करण्यात आला दौंड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री मिनाज मुल्ला व तहसीलदार श्री अरुण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ तुषार बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दौंड शहरांमध्ये तसेच महिला मतदान टक्केवारी कमी असलेल्या भागांमध्ये महिला प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती प्रभात फेरीमध्ये महिलांनी जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले त्यामध्ये ‘स्त्री शक्ती देशाची, ताकद लोकशाहीची’ यासारख्या विविध घोषवाक्य बॅनर्स याचा वापर करण्यात आला याबरोबरच  मतदान प्रतीज्ञा घेऊन दौंड शहरातील बाजारपेठेमध्ये महिलांचे पथक नेमून महिला नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजून देण्यात आले तसेच बाजार पेठेत महिला मतदार यांना मतदार यादी आपले नाव शोधण्यासाठी QR code ची माहिती देण्यात आली यावेळी दौंड तालुक्याचे महिला व बालविकास अधिकारी श्री कुणाल धुमाळ, दौंड शहराचे मंडळ अधिकारी श्री धनंजय गाडेकर, दौंड शहराचे तलाठी श्री संतोष इडोळे श्रीमती वर्षाराणी दळवी मंडळाधिकारी कुरकुंभ तसेच तालुक्यातील महिला विभाग विकास विभागाच्या सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका याचा सहभाग होता.

Leave a Comment

Read More