Search
Close this search box.

Follow Us

दौंड तालुक्यातील विविध भागात “मतदार जनजागृती व मतदान सहभाग कार्यक्रम”

मतदार नोंदणी विशेष मोहीम राबवून मतदान नोंदणी शिबिराचेही आयोजन

महाराष्ट्र न्युज टीम दौंड(दि.17) 35 बारामती लोकसभा मतदारसंघ व 199 दौंड विधानसभा मतदारसंघ, दौंड विधानसभा मतदारसंघातील भटक्या व विमुक्त जाती जमाती तसेच आदिवासी जमातीतील ज्या कुटुंबाचे सतत स्थलांतर होत असते व अद्यापही स्थलांतरामुळे मतदार यादी मध्ये मतदार नोंदणी बाकी आहे अशा ठिकाणी श्री. मिनाज मुल्ला उपविभागीय अधिकारी दौंड व श्री अरुण शेलार तहसीलदार दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी विशेष मोहीम राबवून मतदान नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली तसेच मतदार जनजागृती व मतदान सहभाग कार्यक्रम अंतर्गत सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी जनजागृती करून आवाहन करण्यात आले यामध्ये श्री डॉ तुषार बोरकर नायब तहसीलदार महसूल यांचे पर्यवेक्षण अंतर्गत मंडळनिहाय मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व केंद्रस्तरीय अधिकारी यांचे पथक नेमण्यात आले आहे त्यांचे मार्फत सर्व मतदारांना तसेच दिव्यांग, युवा ,मतदार 85 + मतदार यांना मतदान करण्याबाबत जनजागृती व मतदार प्रतिज्ञा वाचन करून आवाहन करण्यात आले आपले मतदार यादी मध्ये नाव आहे का हे तपासण्यासाठी ‘Know My Name’ अंतर्गत वोटर हेल्पलाइन ची माहिती देण्यात आली तसेच मतदार यादी मध्ये नाव तपासून पाहण्याचे आवाहन करण्यात आले ते गावामध्ये दर्शनी भागावर शासकीय कार्यालयात मतदार यादी मध्ये आपले नाव तपासण्यासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामार्फत आपल्या मोबाईल मधून आपण आपले नाव मतदार यादी मध्ये तपासू शकता याचा जास्तीत जास्त वापर मतदारांकडून व्हावा असे तालुका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले

Leave a Comment

Read More