द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
(दि.13)पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड ही प्रशाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणारी प्रशाला म्हणून ओळखली जाते, प्रशालेत विद्यार्थी विकासाचे नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगानेच शैक्षणिक वर्ष 2023-24 माहे फेब्रुवारी मध्ये झालेल्या एसएससी सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी प्रशालेतील एकूण 39 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्या परीक्षेचा निकाल सीबीएसई बोर्डकडून नुकताच जाहिर झाला त्यात प्रविष्ठित सर्वच विदयार्थी उत्तुंग यश संपादन करून उत्तीर्ण झाले व प्रशालेचा दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला.
प्रशालेतील उत्कृष्ट यश संपादन करणारे विद्यार्थी कु. शौनक भापकर – 94 % व कु.श्रुती रामजी गुप्ता – 94%(प्रथम क्रमांक) कु. सेल्वी राणी – 93.8 % (द्वितीय क्रमांक) ईशान सुनील भागवत – 93.4% (तृतीय क्रमांक) विशाल सूर्यकांत गिरमकर -90.4% ( चतुर्थ क्रमांक) तर पाचवा क्रमांक वेदांत हंबीररावं धुमाळ, – 90.2% याने मिळवला तसेच प्रशालेतील तब्बल आठ विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झाले.सदर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना तत्कालीन प्राचार्य श्री विशाल जाधव तसेच प्रशालेच्या नवोदित प्राचार्या स्वाती कणसे, उपप्राचार्या लक्ष्मी रथ, वर्गशिक्षिका पूनम जाधव तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले होते यावेळी बोलताना, प्रशालेच्या प्राचार्या स्वाती कणसे यांनी प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे भवितव्य आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनामध्ये उत्तुंग यश संपादित करून आपल्या आई वडिलांचा,शाळेचा, गावाचा, देशाचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ऍडमिन मॅनेजर श्री स्वप्नील जुमडे, शिक्षक महेश मोरे, उपप्राचार्या लक्ष्मी रथ, प्रशालेतील शिक्षकवृंद व सर्व कर्मचारी उपस्थित होते.