द महाराष्ट्र न्यूज टीम पाटस
कडेठाण (तालुका दौंड) येथील ग्रामपंचायत सदस्य श्री शरद दिवेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या दौंड तालुका मुख्य कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली त्यांना या निवडीचे पत्र दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मानीय श्री राहुल दादा कुल यांच्या शुभहस्ते देण्यात आले यावेळी श्री हरिभाऊ ठोंबरे, श्री गोरख अण्णा दिवेकर, श्री साहेबराव तात्या वाबळे, श्री नामदेव नाना दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना श्री शरद दिवेकर म्हणाले की भारतीय जनता पार्टीने आणि आमदार राहुल दादा कुल यांनी माझ्याकडे दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पूर्ण करेल तसेच या पदाचा उपयोग जनतेच्या हितासाठी व पक्ष वाढीसाठी करेल तसेच भारतीय जनता पार्टीने व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे मी सोनं करेल आणि त्यांच्या विश्वासास पात्र राहील. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे