द महाराष्ट्र न्युज टीम सातारा
श्रीनिवास पाटील फाउंडेशन व युवा 360° यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कृषीलक्ष्मी-साताऱ्याची” हा महिला शेतकरी सन्मान व गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ आज सातारा येथे संपन्न झाला.
आपल्या सातारा जिल्ह्यातील विविध भागातील कृषि व कृषि पूरक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान ‘कृषीलक्ष्मी-साताऱ्याची’ हा पुरस्कार देऊन करण्यात आला.
दरम्यान श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेला पहिला ‘स्व.सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील (माई) – स्मृती क्रीडा पुरस्कार-२०२४’ हा आंतरराष्ट्रीय तिरंदाज पटू , सुवर्णकन्या अदिती गोपीचंद स्वामी हिला देण्यात आला.
याप्रसंगी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई पवार, श्री.सारंग पाटील, सौ.रचनादेवी पाटील, श्रीमती भाग्यश्री फरांदे, ॲड.वर्षाताई देशपांडे, सौ.संगीताताई साळुंखे, सौ.अल्पनाताई यादव, सौ.छायाताई शिंदे, सौ.संजनाताई जगदाळे, सौ.अनिताताई जाधव, सौ.रजनीताई पवार, सौ.मेघताई नलावडे, सौ.समिंद्राताई जाधव, सौ.उर्मिलाताई कदम, अन्य मान्यवर, श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी, युवा 360°चे समन्वयक, जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या माता-भगिनी उपस्थित होत्या.