द महाराष्ट्र न्युज टीम मुंबई
दै.लोकसत्ता वृत्तपत्राचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मानीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लोकसत्ताच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘वर्षवेध’ या विशेष अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी बोलताना लोकसत्ता वृत्तपत्राने कायमच आपले वेगळेपण टिकवून, निर्भीड पत्रकारितेची परंपरा कायम राखली आहे. तसेच वृत्तपत्रात मराठी शब्दांचा काटेकोरपणे केलेला वापर हे या वृत्तपत्राचे वेगळेपण आहे. सोबतच आम्हीही धाडसी, गतिमान आणि लोकाभिमुख काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे मत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यानी व्यक्त करत लोकसत्ता च्या सर्व टीमला वर्धापण दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका, लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर, खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.