“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास”
द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय वरवंड, ता.दौंड जि. पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या विद्यमाने आयोजित “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास” उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दि. १९ जाने. ते २५ जाने. २०२४ दरम्यान मौजे.देऊळगाव-गाडा (ता.दौंड) येथे आयोजित करण्यात आले होते दिनांक १९ जाने २०२४ रोजी वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री संजय (आण्णा) दिवेकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी मा. संजय आण्णा दिवेकर यांनी विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या आणि लोकसंख्या नियंत्रण व जनजागृती या विषयावर मार्गदर्शन केले.दरम्यान या शिबिरांतर्गत विद्यार्थ्यांनी देऊळगाव गाडा येथे वनराई पद्धतीचे बंधारे बांधले तसेच गावामध्ये लोकसंख्या जनजागृती सर्वेक्षण करून लोकसंख्या नियंत्रण जनजागृती रॅली काढण्यात आली. येथील विविध ठिकाणची साफसफाई करून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. सहभागी विद्यार्थ्यांनी भारुडाच्या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयांवर जनजागृतीचे काम केले शिबिरामधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात उत्साहाने सहभाग घेतला सदर सप्ताह शिबिरामध्ये विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले त्यात ‘भारतीय संस्कृतीचे जीवनातील महत्त्व’ या विषयावर श्री. संतोष परदेशी यांनी तर ‘राष्ट्रीय सेवा योजना जगण्याचा धागा’ या विषयावर श्री. सोमनाथ कदम यांनी मार्गदर्शन केले तसेच ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट’ प्रा एस आर भालेराव यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला . डॉ. रतन जाधव यांनी ‘जलसंवर्धन काळाची गरज’ हे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. डॉ. कल्याण लांगोरे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्त्व पटवून देऊन योगा करण्यास प्रवृत्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शिबिरास सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .प्रा. मारुती भोसले, प्रा. विजय पवार, प्रा.धनश्री बारवकर. श्री. दत्तात्रय गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
सदर शिबीराचा सांगता समारंभ 25 जानेवारी रोजी संपन्न झाला . या समारंभास वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा श्री संजय आण्णा दिवेकर, श्री. नामदेव नाना बारवकर , श्री. अंकुशभाऊ दिवेकर , सौ योगिनीताई दिवेकर , श्री. डी.डी. बारवकर, श्री. राजवर्धन जगताप , श्री संजय शितोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील निगडे आणि उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी या शिबिरांतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्याचे कौतुक केले यावेळी सौ. योगिनीताई दिवेकर यांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले व उपस्थिच्यावतीने शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील निगडे आणि उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर, श्री संजय शितोळे प्रमुख विश्वस्त नारायण महाराज बेट यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सदर शिबीरामध्ये आलेले अनुभव प्रा. डॉ. ज्योती माने यांनी व्यक्त केले. सांगता समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोफणे सर यांनी तर मान्यवरांचे स्वागत डॉ. दत्तात्रय दुर्गाडे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राणी नांदखिले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राम साळुंके यांनी व्यक्त केले सदर शिबिर यशस्वीरित्या पूर्ण होण्यास मौजे देऊळगाव गाडा येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ आणि नारायण बेट देवस्थान चे अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.