स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास” उपक्रम
द महाराष्ट्र न्युज टीम दौंड वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे ‘एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय’ वरवंड, ता.दौंड जि. पुणे व ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास” या उपक्रमा अंतर्गत आज दिनांक २१ जानेवारी २०२४ रविवार रोजी जाचक वस्ती (देऊळगाव गाडा ता दौंड) येथे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयातील 125 राष्ट्रीय सेवा योजना सेवकांच्या श्रमदानातून दोन वनराई पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले या वनराई बंधारेचे कामकाज डॉ. दत्तात्रय दुर्गाडे , डॉ. नानासाहेब गोफणे , डॉ. ज्योती माने,प्रा.राणी नांदखिले ,प्रा. राम साळुंके , प्रा. मारुती भोसले, प्रा. विजय पवार, प्रा.धनश्री बारवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.
यावेळी श्री राजवर्धन जगताप (ग्रामपंचायत सदस्य मौजे देऊळगाव -गाडा) श्री.डॉ. बाळासाहेब जगताप ,श्री डॉ.जामकर व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी बांधण्यात आलेले दोन्ही वनराई बंधाऱ्याची पाहणी केली व यामुळे पाणी आडवण्यास व पाणी जिरण्यास मदत होऊन त्याचा गावाला फायदा होईल असे प्रतिपादन करून राष्ट्रीय सेवा योजना सेवकांचे कौतुक केले