द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे , वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय वरवंड, ता.दौंड जि. पुणे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास” उपक्रमा अंतर्गत “लोकसंख्या नियंत्रण जनजागृती ”
विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक 19 जाने. 2024 ते 25 जाने. 2024 या कालावधीमध्ये नारायण बेट (देऊळगाव-गाडा ) ता. दौंड जि. पुणे येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. संजय (अण्णा) दिवेकर (अध्यक्ष वरवंड ग्राम शिक्षण संस्था) ,सौ. विजया बारवकर (सरपंच देऊळगाव गाडा) , श्री राजवर्धन जगताप (ग्रामपंचायत सदस्य,देऊळगाव) श्री. विशाल बारवकर (ग्रामपंचायत सदस्य,देऊळगाव) , श्री सोमनाथ बारवकर (सामाजिक कार्यकर्ते) , श्री राहुल अवचट व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मौजे देऊळगाव गाडा, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील निगडे आणि उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर , प्रा. हनुमंत हेगडे यांच्या उपस्थितीत झाले दरम्यान श्री सोमनाथ बारवकर, श्री विशाल बारवकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या . यावेळी संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय श्री संजय(अण्णा) दिवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये श्रमसंस्कार आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी तसेच मतदार जनजागृती व सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून परिसरातील लोकांपर्यंत पर्यावरणाचे महत्त्व वृक्षारोपण आणि बालविवाह याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रभारी प्राचार्य आणि उपप्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. नानासाहेब गोफणे (कार्यक्रम अधिकारी) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. दत्तात्रय दुर्गाडे (कार्यक्रम अधिकारी) प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. राणी नांदखिले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाधिकारी डॉ. ज्योती माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रा. राम साळुंके ,प्रा. धनश्री बारवकर,प्रा. मारुती भोसले, प्रा. विजय पवार, प्रा. दिव्या रोकडे, श्री. गायकवाड दत्ता यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.