Search
Close this search box.

Follow Us

“श्री फिरंगाईमाता इंग्लिश मेडियम स्कूल कुरकूंभ” येथे ‘स्नेहसंमेलनाचे आयोजन’

श्री तानाजी यादव प्रतिनिधी कुरकुंभ

पुणे जिल्हा म्हणजे महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी आणि याच पुणे जिल्ह्यातील कूरकूंभ (ता दौंड) येथील श्री फिरंगाईमाता इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन शिवशंकर लॉन्स कुरकुंभ येथे करण्यात आले या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सन्मानीय डॉ सचिन घोरपडे व डॉ प्रसाद कोल्हे तसेच कुरकुंभचे सरपंच श्री सुनील खंडाळे, उपसरपंच श्री संजय शितोळे, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अनिल शितोळे सर,सचिव श्री सचिन शितोळे सर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वतीदेवतेच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांना स्कूलच्या वतीने सन्मानित करण्यात आलेयावेळी गावातील सर्वच प्रतिष्ठित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रा. सदस्य, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच श्री फिरंगाईमाता विद्यालयाचे प्राचार्य श्री नानासो भापकर पर्यवेक्षक श्री नामदेव खडके सर विभागप्रमुख श्री नवनाथ खोमणे सर ,सर्व शिक्षकवृंद, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आजी माजी विद्यार्थी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीच्या वतीने बोलताना उत्कर्ष शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी सन्मानीय डॉ.प्रसाद कोल्हे यांनी या सांस्कृतिक उपक्रमाचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून त्यांना पालकांनी व शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमात सहभागी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले तसेच सन्मानीय डॉ सचिन घोरपडे यांनी सहभागी बालचिमुकल्याना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये शिक्षणाबरोबर असे उपक्रम होणे व त्यात पालकांचा सहभाग असणे महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले या स्नेहसंमेलनामध्ये चिमुकल्यानी उत्साही सहभाग घेऊन विविध गाण्यांवर नाविन्यपूर्ण नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली
श्री फिरंगाईमाता इंग्लिश मेडियम स्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित सर्वच मान्यवर ,ग्रामस्थ, पालक व संस्थेचे अध्यक्ष श्री केशवराव शितोळे सर यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मंडलिक मॅडम यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंजुश्री कांबळे मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वनिता राऊत मॅडम यांनी तर आभार स्वाती कुलथे मॅडम यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री गजानन वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यासाठी श्री फिरंगाईमाता विद्यालयातील माध्यमिक,उच्च माध्यमिक व इंग्लिश मेडीयम विभागातील सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिवशंकर लॉन्सचे रोहिदास झगडे व संपत बनकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

Read More