द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
कुरकुंभ येथील श्री फिरंगाईमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे नेहमी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नेहमीच वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवत असते याच उपक्रमाअंतर्गत विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा व त्यांच्या संशोधक वृत्तीस वाव मिळावा या हेतूने विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले सोबतच वक्तृत्वस्पर्धा, निबंध स्पर्धा, विज्ञान रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते या प्रदर्शनाच्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री नानासाहेब भापकर यांच्या शुभहस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करून ते सर्व विद्यार्थ्यांना खुले करण्यात आले.यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या च्या एकूण चारशे विद्यार्थ्यांनी सुबक विज्ञान रांगोळीचे रेखाटन व उत्कृष्ट प्रकल्प सादर करून सहभाग घेतला होता.सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये, अपघात नियंत्रण प्रणाली, प्रदूषण नियंत्रण प्रणाली, पर्यावरण पूरक प्रणाली, व्यायाम व आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यंत्र प्रणाली,जल शुद्धीकरण प्रकल्प, सौरशेती, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, रोबोट, स्वयंचलित टोल, चांद्रयान्, हायड्रॉलिक मशीन, शाररिक अवयवांचे कार्य आदी प्रकारचे प्रकल्प समाविष्ट होते या प्रकल्पाची पाहणी कुरकुंभ गटाचे केंद्र प्रमुख श्री कामठे सर, विद्यालयाचे प्राचार्य श्री भापकर सर पर्यवेक्षक श्री खडके सर, विभागप्रमुख श्री खोमणे सर, विद्यालयातील विज्ञान शिक्षक व प्राध्यापक यांनी केली. यावेळी बोलताना प्राचार्य श्री भापकर सर यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच कला, क्रिडा व विज्ञान यामध्ये सहभागी व्हावे असे मत व्यक्त करत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाचे उत्कर्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री केशवराव शितोळे सर कार्याध्यक्ष श्री अनिल शितोळे सर व सचिव श्री सचिन शितोळे सर यांनी कौतुक केले सदर विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षकांनी व प्राध्यापकानी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले