विद्यार्थ्यांनी नेहमी विज्ञानवादी असावे: श्री अजिंक्य येळे
द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
दौंड शहरातील ‘पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड’ ही प्रशाला वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखली जाते, त्या अनुषंगानेच प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या वैज्ञानिक वृत्तीस वाव मिळावा हा मानस समोर ठेऊन प्रशालेचे प्राचार्य श्री विशाल जाधव यांच्या संकल्पनेने, या वर्षी प्रशालेमध्ये ‘विज्ञान प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी दौंड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्माननीय श्री अजिंक्य येळे, प्रशालेचे प्राचार्य श्री विशाल जाधव, उपप्राचार्या सौ लक्ष्मी मॅडम व पालक संघ प्रतिनिधी सरिता झा या मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती देवतापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना प्रमुख उपस्थिती सन्मानीय श्री अजिंक्य येळे यांनी प्रशालेच्या उपक्रमाचे अभिनंदन केले व मुलांनी अभ्यासाबरोबरच बालपणापासूनच विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करून नेहमी विज्ञानवादी राहावे असे प्रतिपादन केले. तसेच प्राचार्य
विशाल जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशाला सदैव तत्पर आहे, विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नवादी राहावे व अभ्यासाबरोबर कला, क्रिडा, विज्ञान , साहित्य यामध्ये नावलौकिक मिळवावा असे मत व्यक्त करत उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.यामध्ये इयत्ता पहिली ते दहावी च्या एकूण सहाशे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकल्प सादर करून सहभाग घेतला होता. सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूकंप रोधक यंत्र प्रणाली, वॉटर प्युरीफायर्, सोलर फार्मिंग, ऑरगॅनिक फार्मिंग, ठिबक सिंचन, रोबोट, चांद्रयान्, हायड्रॉलिक मशीन, सौर मंडलं, सेफ ड्रायविंग टूल, आदी प्रकल्प हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी प्रशालेच्या विज्ञान विषय शिक्षिका पूनम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले व सूत्रसंचालन शिक्षिका सोनू पवार यांनी केले..
सदर कार्यक्रमाचे आयोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केले होते