द महाराष्ट्र न्युज टीम दौंड/पुणे
दौंड तालुक्यातील वरवंड येथील एलआयसी प्रतिनिधी व विमा सल्लागार श्री निलेशकुमार चंद्रकांत दिवेकर यांनी सलग पाचव्यांदा विमा क्षेत्रातील ‘एमडीआरटी’ हा बहुमान मिळविला आहे. अमेरिकेमध्ये होणाऱ्या जागतिक विमा परिषद २०२४ साठी त्यांची निवड करण्यात आली आहे
वरवंड व हडपसर परिसरात विमा क्षेत्रात केलेल्या ‘अविरत सेवेमुळेच’ त्यांनी हा नावलौकिक कमावला आहे त्यांच्या या यशाबद्दल वरवंड व हडपसर परिसरातील नागरिक, विमाधारक व मित्रपरिवाराकडून त्यांचे कौतुक होत आहेतसेच या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मित्रपरिवाराकडून श्री निलेश दिवेकर याना सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.