द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
ज्ञान माणसाला सक्षम बनवते तर खेळामुळे मन आणि बुद्धी प्रसन्न होते तसेच शरीर सुदृढ होण्यास मदत होते. त्या अनुषंगानेच दौंड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड या प्रशालेमध्ये अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. त्या अनुषंगानेच प्रशालेतील विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व ज्ञात व्हावे, तसेच त्यांच्यातुन ख्यातनाम व व्यासंगी क्रीडापटू तयार व्हावेत हा मानस समोर ठेवून ,प्रतिवर्षी प्रशालेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही उत्साहपूर्वक व उल्हासपूर्ण वातावरणात क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडामहोत्सवास लाभलेले प्रमुख अतिथी, दौंड तालुका तहसीलदारसो तुषार बोरकर, आंतरराष्ट्रीय कब्बडी क्रीडापटू स्नेहल शिंदे, राष्ट्रीय सिकाई मार्शल आर्ट क्रीडापटू शिवराज वरघडे , पी आय. अरुण सुरेश वाघ.दौंड येथील खवटे ऑर्थोपेडिकचे रोहन खवटे,
दौंड तालुका क्रिडा शिक्षक संघाचे अध्यक्ष जालिंदर आवारी व
प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव या मान्यवरांच्या शुभहस्ते, क्रीडामशाल चे प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवराचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सदर क्रीडास्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या एकूण बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तसेच स्पर्धेमध्ये, बॅडमिंटन, क्रिकेट, रनींग रेस, रिले बॅटल, तसेच लहान मुलांसाठी अनेक फनी गेम्स चे ही आयोजन करण्यात आले होते. सदर क्रीडा महोत्सवामध्ये अनेक ड्रिल व डिस्प्ले ही सादर करण्यात आले, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी लेझीम व परेड संचलनानी उपस्थित मान्यवरांना दिलेली मानवंदना हे खास आकर्षण ठरले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. यावेळी बोलताना कार्यक्रमांस लाभलेले प्रमुख अतिथी तहसीलदारसो तुषार बोरकर यांनी ‘स्पर्धात्मक जीवन आणि जीवनात खेळाचे असणारे महत्व’ याचे विवेचन केले तसेच प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव यांनी आजचा विद्यार्थी हा उद्याचा एक सुजाण नागरिक आहे. शिवाय विद्यार्थीदशेपासून प्रत्येकाने एक तरी खेळ जोपासून त्या खेळामध्ये उज्वल यश संपादन करून आपला आईवडिलांचा, शाळेचा, गावाचा ,देशाचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन यावेळी बोलताना केले या स्पर्धेसाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना क्रिडाशिक्षक विशाल पवार यांचे मार्गदर्शन लाभले सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक सोनू पवार ,अतुल मोरे व आभार हर्षल पोतदार यांनी केले.सदर क्रीडा महोत्सवाचे नियोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केले.
1 thought on “पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड मध्ये “वार्षिक क्रीडा महोत्सव” उत्साहात साजरा.”
Nice event