द महाराष्ट्र न्युज दौंड/पुणे
दिनांक २३ डिसेंबर 2023 हा राष्ट्रीय किसान दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने विजया कृषी सेवा केंद्र ,वरवंड व पारादीप फॉस्फेट्स लि.(झुआरी ॲग्रो केमिकल्स) यांच्या वतीने ‘ऊस व कांदा पिक परिसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास वरवंडमधील प्रतिष्ठीत मान्यवर, वरवंड पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग व कृषी क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते
या कार्यक्रमामध्ये उपस्थित कंपनी चे चीफ जनरल मॅनेजर श्री डी. एस. चव्हाण यांनी शेतकऱ्याना ड्रोन, आयओटी,संरक्षित शेती, अति प्रगत कृषी तंत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, रासायनिक खतांचा संतुलित वापर, पाण्याचे नियोजन या बद्दल मार्गदर्शन केले,
तसेच झुआरी फार्महब चे झोनल सेल्स मॅनेजर श्री किरण पवार यांनी मातीचे आरोग्य सांभाळण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले तसेच नॅनो शक्ती यूरिया व नॅनो डीएपी या उत्पादनाच्या वापराबद्दल माहिती दिली
सोबत झुआरी फार्म हब चे एमडीओ श्री विक्रम लाड यांनी जयकिसान दिवस व कंपनी च्या उत्पादनाबद्दल माहिती दिली
कार्यक्रमाचे वक्ते ऊस तज्ञ श्री राजेश थोरात यांनी ऊस पीक लागवड, जमिनीची सुपीकता वाढविण्याकरिता पीकाची फेरपालट व सेंद्रिय घटकांचा वापर तसेच रोपांचे संख्या नियोजन, रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन या बद्दल सखोल मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, शेतकरी वर्ग व कृषितज्ञ मार्गदर्शक यांचे आभार विजया कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री अजय रोहिदास फरगडे यांनी मानले
1 thought on “पारादीप फॉस्फेट्स लि.(झुआरी ॲग्रो केमिकल्स) तर्फे ‘जय किसान दिवस’ वरवंड येथे उत्साहात साजरा”
👏👏👍👍