Search
Close this search box.

Follow Us

पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड प्रशालेमध्ये स्पोर्ट डेज व मास्टरशेफ इव्हेंट्स चे आयोजन

द महाराष्ट्र न्युज टीम दौंड

दौंड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड ही प्रशाला नेहमीच शालेय शिक्षणाबरोबर इतर विविध कौशल्यपूर्ण उपक्रम राबवत असते त्याअंतर्गत विद्यार्थ्याच्या शाररिक विकासासाठी व आरोग्यपूर्ण जीवनशैली साठी प्रशालेत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना भारतीय खाद्य संस्कृती व पाककला कौशल्य आत्मसात व्हावे हा उद्देश समोर ठेवून प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव व पोदार एज्युकेशन नेटवर्क यांच्या संकल्पनेने मास्टरशेफ इव्हेंट्स हा वैशिष्टेपूर्ण उपक्रम राबविण्यात आला

स्पोर्ट डेज मध्ये विविध वैयक्तिक व सांघिक खेळाचा समावेश होता यामध्ये बहुसंख्य खेळाडूंनी सहभाग घेतला सहभागी खेळाडूंना दौंड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष जालिंदर आवारी व प्राचार्य विशाल जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन प्रेरित व सन्मानित करण्यात आले

तसेच प्रशालेतील चिमुकल्यांना स्वच्छ,निरोगी व पौष्टिक आहाराची आवड निर्माण व्हावी म्हणून पोदार प्रेप मास्टर शेफ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये विद्यार्थी व पालकांनी सक्रिय सहभाग घेऊन विविध प्रकारचे चविष्ट, आरोग्यदायी खाद्य पदार्थ बनवून त्याचे प्रदर्शन भरवून आस्वादाचा आनंद घेतला दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना पोदार प्रेप च्या शीतल वाणीया यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सदर उपक्रमाचे उपस्थित पालकांनी कौतुक केले व पालकांच्या वतीने कोमल शेलार यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल प्रशालेचे प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे आभार व्यक्त केले

Leave a Comment

Read More