Search
Close this search box.

पाटसमध्ये “मतदार जनजागृती आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग कार्यक्रम” संपन्न

मतदार नोंदणी अधिकारी मिनाज मुल्ला साहेब, तहसीलदार अरुण शेलार साहेब व डॉ तुषार बोरकर नायब तहसीलदार दौंड यांची उपस्थिती

द महाराष्ट्र न्युज टीम दौंड

दौंड (दि.25) ३५-बारामती लोकसभा मतदार संघ व १९९-दौंड विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरुण शेलार साहेब व डॉ तुषार बोरकर नायब तहसीलदार दौंड यांच्या उपस्थितीमध्ये मतदार जागरूकता आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग कार्यक्रम (SVEEP ) अंतर्गत पाटस गावामध्ये मतदार जनजागृतीसाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या सर्व आशा-आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी ‘जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून लोकशाही मार्गाने राज्य चालविले जात आहे. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे.देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, आपल्या हक्काचे रक्षण करण्यासाठी मतदान हे आपण टाकलेले पहिले पाऊल असते. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या स्विप कार्यक्रमाचे आयोजन पाटस येथील श्री नागेश्वर विद्यालयामध्ये करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला साहेब, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरुण शेलार साहेब व डॉ तुषार बोरकर नायब तहसीलदार दौंड यांना विद्यालयाच्या वतीने सन्मानित करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित नागरिकांना नवमतदार नावनोंदणी, नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती, मतदान हक्क व अधिकार, मतदान प्रक्रियेत नागरिकाचा सहभाग याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग यांच्यासमवेत प्रभात फेरीमध्ये सहभागी होऊन जनजागृती केली

Leave a Comment

Read More