Search
Close this search box.

दौंड तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी नामदेव खडके

जी.के.थोरात सर यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदी नामदेव खडके तर सचिवपदी संतोष दोरगे यांची बिनविरोध निवड

द महाराष्ट्र न्युज टीम दौंड

दौंड(दि.27)श्री फिरंगाईमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक नामदेव दत्तात्रय खडके यांची दौंड तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) संघटनेच्या अध्यक्षपदी सर्व संमतीने बिनविरोध निवड झाली तर श्री रोकडोबानाथ विद्यालयातील सहशिक्षक संतोष मारुती दोरगे यांची सचिवपदी निवड झाली.
दौंड तालुका शिक्षक लोकशाही आघाडी, दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघ, महिला शिक्षिका संघ, उच्च माध्यमिक शिक्षक संघ व सेवानिवृत्त शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नूतन कार्यकारणीची निवड करण्यासाठी सहविचार सभा समाजसेवक शिवाजीराव जेधे इंग्लिश मेडियम स्कूल बोरीपारधी (चौफुला) येथे जी.के.थोरात सर कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. पंकज घोलप सचिव पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, धर्मेंद्र देशमुख कार्याध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, अशोक दरेकर उपाध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
दौंड तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या नूतन कार्यकारणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. इतर नवनियुक्त पदाधिकारी, सदस्य पुढीलप्रमाणे: *दौंड तालुका कार्यकारणी:- *कार्याध्यक्ष*- लाला साळवे(गिरीम) *जिल्हा प्रतिनिधी*: राजेंद्र जगताप (खुटबाव), रामचंद्र नातू (वडगाव बांडे) भरत शितोळे (कुसेगाव), *उपाध्यक्ष*: विलास थोरात (वासुंदे), गणेश होले (कानगाव) ,रावसाहेब डोंबे(बोरीऐंदी) शांताराम टिळेकर (राहू), *कोषाध्यक्ष* संजय आढाव (गोपाळवाडी), *सहसचिव* सोमनाथ लवंगे (दौंड), शहाजी कुरुमकर (वरवंड) *निरीक्षक*: भाऊसाहेब थोरात (खुटबाव), शशिकांत जांबले (वासुंदे), दत्तू इवरे (रावणगाव), *संपादक* गजानन लोणकर (केडगाव), नितीन शिंदे (राहू ),*सहसंपादक* शिवाजी मोरे (नाथाचीवाडी), भाऊसाहेब थोरात (खुटबाव), *खजिनदार* विलास कदम (भांडगाव), *संघटक* लक्ष्मण पवार (मलठण), संदीप शिंदे (कुरकुंभ), जालिंदर दिवेकर (आंबेगाव), *महिला प्रतिनिधी* जयश्री कुल (यवत), दिपाली ढवळे (वरवंड), *मार्गदर्शक* जी.के. थोरात (कासुर्डी).
यावेळी सुनील ताकवणे, संजय वाबळे मुकुंद भिसे, प्रा.सुनील निंबाळकर,सुवर्णा डोरले, वैशाली खिवंसरा, राजेंद्र रंधवे, महेंद्र भोसले, सुभाष फासगे,नीता हंडाळ (टेंगले), अजित गोरे यांची विशेष उपस्थिती होती.

Leave a Comment

Read More