पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या स्वाती कणसे, पोदार प्रेप च्या हेड मिस्ट्रेस शकुंतला तोरस्कर व ऍडमिन ऑफिसर स्वप्नील जुमडे यांच्या शुभहस्ते उदघाटन
दौंड(दि.31) येथील पोदार प्रेप प्री स्कुल ही बालकांचा सर्वांगीण म्हणजेच ज्ञानात्मक, कौशल्यात्मक, बोधात्मक विकास घडवणारी प्री स्कुल म्हणून ओळखली जाते. त्या अनुषंगानेच ‘पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड’ च्या प्राचार्या सौ. स्वाती कणसे यांच्या संकल्पनेतून ‘आजीच्या रेसिपीचा जादुई स्पर्श ‘ हा मास्टर शेफ इव्हेंट प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड च्या प्राचार्या सौ स्वाती कणसे, पोदार प्रेप च्या हेड मिस्ट्रेस शकुंतला तोरस्कर व ऍडमिन ऑफिसर स्वप्नील जुमडे आदी मान्यवराच्या शुभहस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले . या कार्यक्रमामध्ये पोदार प्रेप मधील नर्सरी ते सिनियर केजी या वर्गातील 100 विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सक्रिय सहभाग घेतला त्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ तयार करून बालकांनाही फळे,भाज्या, सुका मेवा, बिस्किटे यापासून ही चविष्ठ व पौष्टिक पदार्थ कसे करू शकतो याचे धडे दिले. तसेच या कार्यक्रमामध्ये प्रेप मधील बालकांनीही अनेक प्रकारच्या पाककृती तयार करण्यामध्ये हातभर लावत आजीच्या हातच्या पदार्थांच्या चवीची अनुभूती दिली. तसेंच काहींनी तयार झालेल्या पदार्थाचे उपस्थित, मान्यवरांच्या पुढे सादरीकरण ही केले. यावेळी बोलताना प्राचार्या स्वाती कणसे यांनी, आजीच्या प्रेमाची महती व्यक्त करून, आजी आपल्याला निरनिराळ्या चविष्ट व सकस असे पदार्थ करून देत असते. तिच अनुभूती आज या बालचमुनी उपस्थित सर्वांना दिली असे मत व्यक्त केले व मुलांनी ही आपल्या अभ्यासाबरोबरच आई आजी यांकडून पाककलेचे धडे घ्यावेत असे प्रतिपादन करीत उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन पोदार प्रेप च्या हेड मिस्ट्रेस सौ.शकुंतला तोरस्कर व सर्व स्टाफ यांनी केले. यावेळी विद्यार्थी पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(द महाराष्ट्र न्यूज टीम दौंड)