द महाराष्ट्र न्युज टीम भिगवन
दि.15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंटूनाना कोकाटे बालविदयालयात वैचारिक स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा झाला यावेळी प्रमुख पाहुणे ज्यांच्या आगमनाने वातावरण अगदीच मनमोहक व प्रसन्न झाले असे सन्मानीय मेजर दिलीप गुळवे व बाळासाहेब गुळवे हे लाभले तसेच यावेळी शिक्षकवृंद, परिसरातील पालकवर्ग, महिलाभगिनी व विद्यार्थी वर्ग यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्याच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करून सामूहिकरित्या राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या या मंगल प्रसंगी बालविद्यालयातील बालचिमुकल्यानी देशभक्तीपर गीतावर अविश्वसनीय व नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केले. यावेळी बालविद्यालयातील मुलांना नेहमीच जे विचार आणि शारीरिक हालचालींचे स्वातंत्र्य दिले जाते तेच जपत आज भाषण स्वातंत्र्याचे महत्व समजावे ते एक समाज प्रबोधनाचे शस्त्र म्हणून वापरावे यासाठी मुलांना व पालकांना व्यासपीठ निर्माण करुन देत आपले सदुपयोगी विचार मांडावेत या हेतूने वैचारिक स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात लढण्याची नाही तर घडण्याची व त्यांनी दिलेले विचार पुढे नेण्याची नितांत गरज आहे त्यामुळे दूरदृष्टी ठेवा व आळस झटकून नवचैतन्याने जीवनाची सुरुवात करा असा संदेश देण्यात आलात्यानंतर आज मातृभाषेसह विविध भाषांचा सखोल अभ्यास असणे काळाची गरज आहे त्यावेळी राजेंनी जे 16 भाषेवर प्रभुत्व मिळवत अथांग ज्ञानसागरातुन स्वराज्य निर्माण केले त्यामुळे समस्या हि भाषेची नाही तर विचाराची आहे तसेच थोर स्वातंत्र्यवीरांचे विचार कार्यक्रमापुरतेच नको ते आत्मसात करावे असे सुनवत कार्यक्रमाची सांगता झाली.