द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
दौंड.(दि.15) पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंडमध्ये आपल्या भारत देशाचा 78 वा ‘स्वातंत्र्य दिन’ हा आनंददायी व मंगलमयी वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या या मंगलप्रसंगी कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून लाभलेले श्री.गणेश बिरादार(कमांडंट एस. आर. पी. एफ, ग्रूप पाच दौंड), डॉ. राहुल जगदाळे (अध्यक्ष दौंड मेडिकल असोसिएशन), डॉ. राजेश दाते (माजी अध्यक्ष रोटरी क्लब दौंड), डॉ. नितीन पवार (बालरोग तज्ञ दौंड), डॉ. संजय वाघमारे (सिद्धिविनायक हॉस्पिटल देऊळगाव), प्रशालेच्या प्राचार्या स्वाती कणसे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सामूहिकरित्या राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या या मंगलप्रसंगी प्रशालेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी, देशभक्तीपर गीतांचे गायन व देशाप्रती प्रेम आदरभाव व्यक्त करणारी मनोगते व्यक्त केली. तसेच क्रांतिकारकांच्या कार्याची महती स्पष्ट करणारी नाटीका व नृत्याविष्कार सादर केले. तसेच यावेळी प्रशालेतील बालचमुंनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या व्यक्तीरेखा साकारून उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी सहावी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास परेड संचलनातून मानवंदना दिली.त्यावेळी बोलताना, प्रमुख अतिथी यांनी आपण आपल्या प्रामाणिक कार्यातून ही देशसेवेस हातभार लावू शकतो. तसेच आपण आपले घर , गाव, परिसर ,सार्वजनिक स्थळे, स्वछ ठेऊन स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगी मेहनत करण्याचा गुण ठेवावा असे प्रतिपादन केले. तसेच प्रशालेच्या प्राचार्या यांनी, आपण प्रत्येकाने, अभ्यासा बरोबरच, नेतृत्व कौशल्य आत्मसात करावे तसेच मेहनत व सचोटीने अभ्यास करून, देशाच्या विकासात योगदान दर्शवणाऱ्या निरनिराळ्या क्षेत्रात प्रत्येक विद्यार्थ्याने यश संपादन करून , आपला आईवडिलांचा व शाळेचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन केले. व उपस्थित सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका- सोनू पवार , विद्यार्थीनी वैभवी म्हस्के, विद्यार्थी नैतिक पाटील यांनी तर आभारप्रदर्शन हर्षल पोतदार यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केलें. त्यावेळी, प्रशालेचे विद्यार्थी शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.