Search
Close this search box.

Follow Us

‘पिंटुनाना कोकाटे बाल‌विद‌यालयाचा’ वर्धापनदिन उत्साहात संपन्न

द महाराष्ट्र न्यूज टीम करमाळा

गुरुवार दि .13/06/2024 रोजी करमाळा तालुक्यातील खातगाव नं 2 येथील ‘श्री सद्‌गुरु शिक्षण प्रसारक बहुउदेशीये संस्थेचे पिंटुनाना कोकाटे बालविद्यालयाचा’ स्थापना दिवस व शाळेचा पहिला दिवस उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय ‘श्री गणेशजी करे-पाटील’ व कार्यक्रमाचे अध्यक्ष थोर व्यक्तिमत्त्व ज्यांनी संस्थेच्या उभारणीपासून सतत सहकार्य व मार्गदर्शन केले असे बारामती अँग्रोचे संचालक व मा. जि.प उपाध्यक्ष ‘श्री सुभाष आबा गुळवे’ तसेच खातगाव व टाकळी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा. सदस्य, सोसायटी चेअरमन ,ग्रामस्थ , पालक, महिलाभगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे संस्थेचे अध्यक्ष श्री माऊली कोकाटे सर यांनी सहर्ष स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यावेळी बोलताना त्यांनी संस्थेचे ध्येयं धोरणे, विद्यार्थी विकास व एकविसाव्या शतकातील सुजाण पालक व त्यांची कर्तव्य याबद्दल मार्गदर्शन केले तसेच पालकांनी व ग्रामस्थांनी ज्ञानाची व्याप्ती वाढवावी व वर्धापनदिनी पालकांनी स्वतःचे विचार व्यक्त करण्याचे आवाहन केले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये बोलताना ‘श्री गणेशजी करे पाटील’ यांनी पालकांमध्ये शिक्षणाबद्दलची जागरूकता करत त्यांच्यामध्ये नवचैतन्याची प्रेरणा निर्माण केली तसेच करमाळ्याच्या मातीतील रक्त काय करु शकते याची कल्पना करण्यास भाग पाडले व श्री माऊली कोकाटे सर यांची शिक्षणाबद्दलची तळमळ, मार्गदर्शन व योगदान याबद्दल कौतुक केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘श्री सुभाष गुळवे आबांनी’ बोलताना पालकांनी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन मुलांना शिक्षण द्यावे त्यात कुठेही कमी पडू नये व दिरंगाई करू नये असे खडे बोल सुनवत सर्वांनाच प्रेमपूर्वक जाब विचारात कानउघडणी केली व संस्थेच्या वर्धापनदिनास शुभेच्छा देत खंबीर साथ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्री सागर गुळवे सर व टाकळी गावचे उपसरपंच श्री गणेश कोकाटे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली .

Leave a Comment

Read More