बदली न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा संताप;

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने बदलीच्या कारणावरून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, पोलीस कर्मचारी अमोल भिसे यांनी बदलीची मागणी पूर्ण न झाल्याच्या संतापातून आयुक्तांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराला कारने धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

ही घटना 3 नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी अमोल भिसे यांच्याविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कायद्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याच्या आरोपामुळे पोलीस दलातील शिस्तीचा प्रश्न चर्चेत आला आहे.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon