पोलीस ठाण्यातील मुद्देमालाचा गैरवापर, तक्रारदाराला अधिकाऱ्याकडून धमकी ,वरिष्ठांची बघ्याची भूमिका.
*पोलीस ठाण्यातील मुद्देमालाचा तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने केला स्वतःसाठी गैरवापर*
सोलापूर – मंद्रूप पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी कर्तव्यात कसूर करून केलेल्या बेकायदेशीर कामकाजाच्या विरोधात राष्ट्रीय छावा संघटनेने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांनी पूनम गेट, जिल्हा परिषद, सोलापूर येथे लाक्षणीक उपोषण केले.
यावेळी कार्याध्यक्ष संजय पारवे, उत्तर तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील, शेखर फंड, शिरीष जगदाळे, सागर माने, विकास घंटे, बालाजी खांडेकर, संजय गायकवाड, विकास पाटील, आशिष चव्हाण, शहाजी चव्हाण, सागर अंबुळे, प्रेम पाटील, सोमनाथ पाटील, अमोघसिद्ध पाटील,नागेश घोरपडे, गजानन पवार, मारुती सावंत, बबलू घाडगे, सतीश चिंचोळे, रामजी इंगळे, मल्लिकार्जुन तलवार, सिद्ध इंगळे, सोमनाथ पवार, ज्ञानेश्वर पवार, नितीन चव्हाण, विशाल वाघमारे, साहिल निगवान, सोमा जाधव, माऊली सुरवसे नागेश घोरपडे, गजानन पवार, मारुती सावंत, बबलू घाडगे, सतीश चिंचोळे, रामजी इंगळे, मल्लिकार्जुन तलवार, सिद्ध इंगळे, सोमनाथ पवार, ज्ञानेश्वर पवार, नितीन चव्हाण, विशाल वाघमारे, साहिल निगवान, सोमा जाधव, माऊली सुरवसे,विलास रेवजे,मारुती भोसले,रवी हौशेट्टी,संजय जगताप, अभिजित पाटील, संकेत रेवजे,योगेश चोपडे ,आजय ढेपे, मेघराज काळे,आनील पवार, एडवोकेट लाटे
यांसह राष्ट्रीय छावा संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यांत सविस्तर हकीकत अशी की.., पोलीस ठाणे म्हणजे कायद्याचे रक्षक, मात्र मंद्रूप पोलीस ठाण्यातील शासकीय साहित्याचीच तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप छावा संघटनेने केलेला आहे. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने मंद्रूप पोलीस ठाण्यात असलेली गुन्ह्यातील गाडी उचलून थेट आपल्या शेतातील गड्याला (नोकराला) वापरण्यासाठी दिली होती. एवढेच नाही तर, पोलीस स्टेशनमधील इन्व्हर्टर बॅटरीही त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी उचलून नेली होती.

हा प्रकार सुरू असताना संबंधित अधिकाऱ्याची बदली झाली. बदली झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस येण्याची भीती वाटल्याने, रात्रीच्या अंधारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती गाडी आणि इन्व्हर्टर-बॅटरी पुन्हा पोलीस ठाण्यात आणून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. सरकारी मालमत्तेचा अशा प्रकारे वैयक्तिक वापर करणे हा गंभीर गैरप्रकार आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याला याबद्दल जाब विचारला असता छावा संघटनेत तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे, यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला डाग लागत आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर अँटी करप्शन अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेने केली आहे.



