मंद्रूप पोलीस ठाणे मधील ज्या चारचाकी व दुचाकी वाहनांचा मालकी हक्क कोणीही सांगितला नाही अशी 2 चारचाकी वाहने व 50 दुचाकी वाहने मंद्रूप पोलीस ठाण्यात बऱ्याच कालावधीपासून पडून आहेत चार चाकी वाहनांमध्ये मारुती सुझुकी कार व मारुती 800 कार अशी आहेत,

सदरील वाहने कोणाची असतील त्यांनी त्यांच्या मालकीचे हक्काचे पुरावे कागदपत्र घेऊन मंद्रूप पोलीस ठाणे येऊन ओळख पटवून वरील नमूद केल्याप्रमाणे बेवारस अवस्थेत असलेली दुचाकी व चार चाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अस्तव्यस्त अवस्थेत पडून आहेत मालकी हक्काची ओळख पटत नसल्याने वाहनांची निर्गती करण्यास विलंब होत आहे , म्हणून पोलीस उपअधीक्षक मंद्रूप पोलीस ठाणे यांनी सर्व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की मंद्रूप पोलीस ठाणे आवारात असलेली चारचाकी व दुचाकी वाहने समक्ष येऊन पहावी,

ज्या कोणा नागरिकांची चार चाकी व दुचाकी वाहने असल्याचे आढळून आल्यास त्यांनी त्यांच्याकडील वाहनांचे उपलब्ध कागदपत्र घेऊन यावेत व आपली वाहने परत घेऊन जाण्याचे आवाहन मंद्रूप पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे ,

तसेच सदरचे आवाहन केल्यापासून पंधरा दिवसापर्यंत पोलीस ठाण्यात वाहनाचे हक्क सांगणारे कोणी न आल्यास त्या वाहनांचा कोणीही मालक नाही असे गृहीत धरून सर्व दुचाकी व चारचाकी बेवारस वाहनांची पुढील योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून निर्गती करण्यात येईल असे आवाहन मंद्रूप पोलिसांनी केले आहे




