स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी – 2,27,200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयामध्ये जबरी चोरी व घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत गुन्हा आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संजय जगताप यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून श्री संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी, अंमलदार यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करणे व तसेच पंढरपुर, अक्कलकोट येथील बस स्थानकावर भाविकांची दागदागिने, रोख
रक्कमेची होत असलेल्या चोरींचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते.

दिनांक ०९/०९/२०२६ रोजी अक्कलकोट उपविभागात कुंभारी येथील टोलनाक्यावर पेट्रोलींग करीत हजर असताना गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अक्कलकोट बस स्थानकावर प्रवासी चढत असताना चोरी केलेले दोन महिला सध्या कुंभारी बस स्थानकावर थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आम्ही पथकासह सदर ठिकाणी रवाना होवून, कुंभारी बसस्थानकावर बातमीप्रमाणे थांबलेले दोन संशयीत महिला मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी निश्चीत तारीख माहिती नाही परंतु जुलै व ऑगस्ट महिन्यात आम्ही अक्कलकोट बस स्थानकावर चोरी केली असल्याचे कबुली दिली, सदर बाबत अभिलेख तपासले असता खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अ.क्र.१,ર पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे ,अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. व कलम ४१८/२०२६ भा.न्या.सं. ३०३ (२) ४४९/२०२६ भा.न्या. सं. ३०३ (२) नमुद आरोपीतांना अधिक विश्वासात घेवून त्याच्यांकडे कौशल्यपुर्ण तपास करता त्यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गु.र.नं. ४१८ / २०२६ भा. न्या. सं. कलम ३०३ ( २ ) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल त्यामध्ये १० ग्रॅम ४५० मिली वजनाचे एक सोन्याचे मंगळसुत्र बाजारभाव प्रमाणे १,५२,०००/- तसेच अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गु.र.नं. ४४९ / २०२६ भा. न्या. सं. कलम ३०३ ( २ ) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल पैकी ०५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसुत्र बाजारभाव प्रमाणे ७५, २००/- असे एकुण मुद्देमालापैकी १५ ग्रॅम ४५० मिलीचे सोन्याचे दागिने बाजाराभावाप्रमाणे एकुण २,२७,२०० /- रू अं. किमंतीचे सोन्याचे दागिणे आरोपी यांचेकडुन हस्तगत करण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, श्री विजय कबाडे, व वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार सलीम बागवान, हरीदास पांढरे, विरेश कलशेट्टी, व्यंकटेश मोरे, जगदीशराठोड, पोकॉ कपिल काटकर, योगेश जाधव, सुनिल पवार, महिला पोलीस हवालदार दिपाली जाधव, सुनंदा झळके यांनी बजावली.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon