माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन अर्ज फेटाळला
माळशिरस : अकलूज येथील २५ लाख रुपयांच्या कथित लाच प्रकरणात आरोपी असलेले पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ यांचा अंतरिम जामीन अर्ज माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
अकलूज पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तसेच संबंधितांना अटक न करता नोटीस देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या प्रकरणात ACBच्या कारवाईदरम्यान दोन खासगी व्यक्तींना ५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले होते. त्यानंतर पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात राहुल वाघ यांनी अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला.
या निर्णयामुळे २५ लाखांच्या कथित लाच प्रकरणातील तपासाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.



