नांदणी येथे २२ लाख ९३ हजार १० रूपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा पकडला.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मंद्रूप पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०३/०९/२०२६ रोजी मंद्रुप पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना एक पांढरे रंगाची• एक्स.यु. व्हि. ५०० या गाडीमध्ये गुटखा घेवून जात असल्याबाबत बातमी मिळाली होती. मिळालेल्या बातमीप्रमाणे कारवाई करण्यासाठी मंद्रुप पोलीस ठाणेकडील श्रेणी पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कदम, पोशि/ १००३ श्रीशैल
शिवणे व पोशि/ १३५५ मनोज राठोड यांच्यासह नांदणी येथे नाकाबंदी राबविले. नाकाबंदी दरम्यान संशयीत वाहन पांढरे रंगाच एक्स.यु.व्हि ५०० हे वाहन पहाटे ०६/०० वा चे सुमारास नांदणी येते आलेनंतर सदर वाहनास थांबवून त्याची तपासणी केली. त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे पोते त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे दिसुन आले. त्यानंतर मिळून आलेल्या प्रतिबंधित गुटखावर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांना कळविले. त्यानंतर श्री. रामानंद उमाशंकर स्वामी अन्न सुरक्षा अधिकारी, सहायक आयुक्त, अन्न व औषधं प्रशासन विभाग सोलापूर यांनी सदरचा प्रतिबंधित गुटखा मालाची पाहणी केली असता कारमध्ये एकुण ०६ लाख, ९३ हजार ०१० रूपये किंमतीचा अवैध प्रतिबंधित गुटखा मिळून आला. तसेच एक महिंद्रा कंपनीची एक्स. यु. व्हि ५००
कार अंदाजे किंमत १६,००,००० /- रू असा एकूण २२ लाख ९३ हजार ०१० रूपये किमतीचा गुटखा व वाहन यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी मा. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. विजयकुमार कबाडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / शंकर पटवारी, सपोनि / देविदास करंडे, श्रेणी पोउनि / चंद्रकांत कदम,पोना / ५५८ सिकंदर मुल्ला, पोशि/ १००३ श्रीशैल शिवणे व पोशि/ १३५५ मनोज राठोड, पोशि/ ६३५ माजिद शेखयांनी बजावली आहे.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon