*दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ*

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

*गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडून कौतुक*

सोलापूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढवून त्यांना दैनंदिन जीवनात सहजपणे इंग्रजी संभाषण करता यावे, या उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मांडलेल्या अभिनव उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी कौतुक केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निजी कक्षात झालेल्या बैठकीत या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण तसेच दक्षिण सोलापूर गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके, मल्लिनाथ स्वामी तसेच निवडक इंग्रजी शिक्षक उपस्थित होते.


या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते इंग्रजी शिक्षण न देता प्रत्यक्ष व्यवहारात इंग्रजीचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. परिपाठामध्ये इंग्रजी भाषेत भाषण, सुविचार, बातमी वाचन, संवाद सादरीकरण यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon