वरिष्ठांच्या धास्तीने मंद्रूप पोलिसांचा ऑर्केस्ट्राबारवर छापा १४ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर ते विजापूर रोड वरील वडकबाळ गावच्या शिवारात आम्रपाली ऑर्केस्ट्राबार मध्ये चोरून विनापरवाना व नियमांचे उल्लंघन करून ऑर्केस्ट्राबार चालु असल्याची गोपनीय माहीती पोलीस निरीक्षक, शंकर पटवारी यांना मिळाल्याने, त्यांनी पोलीस ठाणे कडील पोलीस
पथका मार्फत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून एकूण १० पुरूष व ०४ महीलां यांच्या विरूध्द
मंद्रुप पोलीस ठाणेस गुरनं ३३१ / २०२६ बीएनएस २९६, ३(५) वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई मध्ये ऑर्केस्ट्राबार मधून ४,८२,००० (चार लाख ब्याऐंशी हजार ) रूपये किंमतीचे ऑर्केस्ट्राबार मधील साहीत्य, मोटर सायकल व रोख रक्कम पोलीस पथकाने जप्त करून आरोपीं नामे १) सुप्रिया कुमार मोदल वय १९ रा. सुभाष पाली बारासात नॉर्थ २४ परगणा पश्चिम बंगाल, २) नेहा सिंकदर मलीक वय २४ रा. ९४ टालीगंज रोड कोलकाता पश्चिम बंगाल ३) राक्षी दिपककुमार संधा वय २० रा. कैतुका नंदन बरण बिहार, सध्या सोरेगांव ता. उत्तर सोलापूर ४) रूबी किशोरी पटेल वय २३ रा. नरकटीया पुर्वी चम्पारण बिहार सध्या सोरेगांव ता. उत्तर सोलापूर, ५) मनोज माधव पाटील बार चालक रा.प्लॉट नंबर ९१ पापारामनगर विजापूर रोड सोलापूर, ग्राहक ६) अमर अशोक तोडकर वय २५ वर्ष
रा.पंचशील नगर इंडी जि. विजापूर ७) विरेश बसवराज शेटटर रा . इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक ८)
परमानंद उदयकुमर पोतदार वय २३ रा. गांधी चौक इंडी जि. विजापूर कर्नाटक, ९) बसवराज शांताप्पा
कुंटोजी वय २१ वर्ष रा. मार्केट यार्ड इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक १०) शांताप्पा साहेबांना हदगल
वय २८ रा. शांतेश्वर टेम्पल विजापूर राज्य – कर्नाटक, १९) सोमय्या बसय्या मठपती वय ३६ रा बगले
प्लॉट इंडी विजापूर राज्य कर्नाटक, १२) महमंद हिदायतुला माशाळकर वय ५० वर्ष रा. शापेट मेनरोड
विजापुर राज्य कर्नाटक १३) उमरफारूक अब्दुललतीफ बगली वय ३६ रा. के. के. जियस जपळ कासगीरी गल्ली विजापूर कर्नाटक व कामगार १४) रियाज हारून आवटे वय २८ वर्ष रा. मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरूध्द मंद्रुप पोलीस ठाणेस विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.विजय कबाडे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कटटे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोसई राज डांगे, श्रेपोसई चंद्रकांत कदम, पोहेकॉ श्रीराम आदलिंग, पोहेकॉ उत्तम सासवे, पोना सिंकदर मुल्ला, पोकॉ अश्पाक मियावाले, पोकॉ बिरण्णा वाघमोडे, महीला पोलीस अंमलदार पुजा काळे, मपोकॉ विदया कांबळे, चापोहेकॉ नानासाहेब अवघडे यांनी हेही कामगिरी बजावली आहे.

मंद्रूप पोलीस स्टेशन हद्दीत,आणखी दोन ते तीन डान्सबार सुरू आहेत, डान्सबार व्यतिरिक्त , टाकळी परिसरातील अवैध मटका, तीन पत्त्याचे जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक , या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची कारवाई होणे गरजेचे असल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहे, सदरील कारवाई ही वरिष्ठांच्या धास्तीने केली असल्याचे बोलले जात आहे, भविष्यात मंद्रूप पोलीस स्टेशन कडून सरसकट कारवाई होईल का हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे..

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon