पीक विमा कंपन्यांच्या नावाने बार्शीत शेतकऱ्यांचे अनोखे शिमगा आंदोलन!

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

बार्शी – शेतकऱ्यांच्या थकीत पिक विम्यासाठी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या विमा कंपन्यांच्या नावाने शेतकरी संघटनेच्या वतीने बोंबाबोंब करून शिमगा आंदोलन करण्यात आले.
बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथील मुख्य चौकामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.

यावेळी गायकवाड म्हणाले, जर विमा कंपन्या व सरकारला शेतकऱ्यांचा पूर्ण विमा परतावा देणे होत नसेल तर सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना बंद करून, आजपर्यंत प्रतिहेक्टरी केलेल्या खर्चाप्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या नावे दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामाला मदत म्हणून प्रति हेक्टरी १८ हजार रुपये जमा करावेत किंवा खरीप २०२५ मधे राज्यातील वगळलेली सर्व मंडळे घेऊन आजपर्यंतचा सर्व थकीत पीकविमा तत्काळ जमा करावा अन्यथा लवकरच विमा कंपन्या व संबंधित शासकीय राज्यस्तरीय कार्यालयावरती तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील असा इशारा दिला. यावेळी बापूराव गरदडे, महादेव यादव, बिभीषण जोडवे, संदीप सुर्वे, पिनू सुर्वे, विठ्ठल गरदडे, रामराव शिंदे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

 

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon