बार्शी शहर पोलिसांची धडक कारवाई; दोन चोरट्याना अटक, 10 दुचाकी हस्तगत

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या बुलेट मोटारसायकलच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने (गुन्हे शोध पथक) तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने दोन सराईत वाहनचोरांना निष्पन्न करून अटक केली. आरोपींकडून पुणे, येडशी, लातूर व इतर परिसरातून चोरी केलेल्या एकूण १० मोटारसायकली, त्यामध्ये ४ बुलेट मोटारसायकलींचा समावेश असून, एकूण किंमत सुमारे ८ लाख २० हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राऊत चाळ, स्टेशन रोड, बार्शी येथील रहिवासी प्रतीक चंद्रकांत पवार (वय ३० वर्षे) यांच्या मालकीची अंदाजे १ लाख २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बुलेट ३५० EFI (क्र. MH25AY2476) ही दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री घरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.
याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६०१/२०२६, BNS कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास बार्शी शहर पोलिसांचे डी.बी. पथक करीत होते. या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपींची माहिती मिळवली. त्यानुसार दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बार्शी शहरासह पुणे, येडशी, लातूर व इतर परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

याप्रकरणी अटक/निष्पन्न आरोपी १) आकाश हरीचंद राठोड, वय २२ वर्षे, रा. कन्हेरगाव, ता. परळी, जि. बीड. आणि २) ऋषिकेश महादेव सुरवसे, वय २३ वर्षे, रा. मांजरी, ता. व जि. लातूर येथील आहेत. आरोपींकडून चोरीच्या १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण अंदाजे किंमत ८ लाख २० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात बार्शी शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

 

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon