द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
दौंड( दि.1जुलै) पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड ही प्रशाला नेहमी विद्यार्थी हितोपयोगी शालेय उपक्रम नेहमीच साजरे करत असते. विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व कौशल्य यावे तसेच विद्यार्थ्यांना शालेय विकासात योगदान देणाऱ्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळता याव्यात याचे कौशल्य प्राप्त होण्यासाठी प्रशालेमध्ये ‘स्टूडेंट कौन्सिल इलेक्शन’ घेण्यात आलेत्यामध्ये प्रामुख्याने हेड बॉय, हेड गर्ल, स्पोर्ट कॅप्टन, कल्चररल सेक्रेटरी, हाऊस कॅप्टन, आदी पदांसाठी मतदान घेण्यात आले. सदर स्टूडेंट कौन्सिल इलेक्शन ची पूर्ण प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक व पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली. त्यासाठी एकूण बाराशे विद्यार्थ्यांनी मतदान केले. यामध्ये निवडणूक जिंकून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणारा ‘विद्यार्थी पदग्रहण सोहळा’ प्रशालेमध्ये संपन्न झाला सदर कार्यक्रमास मुख्य उपस्थिती सन्मानीय राजलक्ष्मी शिवणकर (कमांडंट एस. आर. पी. एफ, ग्रूप-7 दौंड). डॉ. रोहन खवटे (ख्यातनाम ऑर्थोपेडिक सर्जन दौंड) डॉ.मिनल वागजकर (जनरल सर्जन दौंड), प्रशालेच्या प्राचार्या – स्वाती कणसे, उपप्राचार्या – लक्ष्मी रथ, पोदार प्रेप विभागाच्या हेड मिस्ट्रेस – शकुंतला तोरस्कर तसेच शिक्षक पालक संघातील सर्व सदस्य आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सदर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बॅज व स्याश देऊन गौरविण्यात आले. तसेच इतरही मुलांना ही प्रेरणा मिळावी म्हणून प्रत्येक वर्गातील मॉनिटर यांना ही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बॅज देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी इग्निस हाऊस, वेंटस हाऊस, टेरा हाऊस, अक्वा हाऊस, या चारही हाऊस च्या हाऊस मास्टर ना तसेच प्रशालेच्या क्रीडा विभागाचे कॉर्डीनेटर विशाल पवार यांना हि यावेळी बॅज देऊन गौरविण्यात आले.
त्यावेळी बोलताना तसेच कार्यक्रमास लाभलेल्या मुख्य अतिथी राजलक्ष्मी शिवणकर यांनी विद्यार्थ्यांनी आई, वडिल व गुरू यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्या ध्येयाची वाटचाल सुरु करून ते ध्येय मेहनतीने व प्रयत्नांची पराकाष्टा करून प्राप्त करावे व एकलव्याप्रमाणे गुरूंप्रती आस्था मनात बाळगावी असे प्रतिपादन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रशालेच्या प्राचार्या स्वाती कणसे यांनी आजचा विद्यार्थी हा उद्याच्या सक्षम भारताचा यशस्वी नागरिक आहे म्हणूनच आपण प्रत्येकाने अभ्यासाबरोबरच नेतृत्व कौशल्य आत्मसात करावे तसेच मेहनत व सचोटीने अभ्यास करून, आपला आईवडिलांचा व शाळेचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन केले. व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका- सोनू पवार व विद्यार्थिनी स्नेहल सोनवणे यांनी केले तर आभार शिक्षिका अवंतिका नाईक यांनी व्यक्त केले.त्यावेळी प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी ,पालक प्रतिनिधी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केलें.