विठ्ठलच्या साखर विक्री केंद्राचा शुभारंभ – ह.भ.प. उत्तम महाराज स्वामी यांची उपस्थिती..

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

विठ्ठलच्या साखर विक्री केंद्राचा शुभारंभ – ह.भ.प. उत्तम महाराज स्वामी यांची उपस्थिती..

प्रतिनिधी- सोमनाथ गोरे पंढरपूर

माढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री अभिजीत धनंजय पाटील यांच्या आदेशान्वये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्री केंद्राचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.

दीपावलीनिमित्त श्री घाडगे पाटील कॉम्प्लेक्स, तीन रस्ता चौक येथे साखर वाटप सुरू

वेणुनगर पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणुनगर, ता. पंढरपूर यांच्या वतीने दीपावली सणानिमित्त श्री घाडगे पाटील कॉम्प्लेक्स, तीन रस्ता चौक येथे साखर केंद्र सुरू करण्यात आले. या साखर केंद्राचा शुभारंभ साखर पोत्यांचे पूजन करून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. ह.भ.प. उत्तम महाराज स्वामी यांच्या शुभहस्ते साखर पोत्यांचे पूजन पार पडले.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना साखर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या साखर केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यावेळी कारखान्याच्या वतीने साखर वितरण व्यवस्थेची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला कारखान्याचे साखर विभाग विक्री प्रमुख महेश घाडगे साहेब, संचालक दिनकर दाजी चव्हाण, वास्तुशिल्प ट्रेडर्सचे आर. बी. जाधव साहेब, पांडुरंग पाटील, देवबाप्पा, माजी विस्तार अधिकारी चव्हाण गुरूजी, माजी सरपंच मेजर एकनाथ आप्पा चव्हाण, ॲग्री सुपरवायझर ज्ञानेश्वर घाडगे, उद्योजक व अध्यक्ष दत्तात्रय येडगे, यशवंत चव्हाण सर, माजी सरपंच हरिदास नवले, प्रगतशील ऊस बागायतदार अशोक देवकर, शरद घाडगे साहेब, ऊस पुरवठा अधिकारी श्याम शिंदे साहेब, कमलाकर गोफणे, रोहित मोरे, लक्ष्मण चव्हाण, सोमनाथ गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच कारखान्याचे सभासद,कारखाना प्रशासन अधीकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे साखर केंद्राच्या कामकाजाला उत्साहात प्रारंभ झाला.

दीपावलीच्या सणानिमित्त नागरिकांना साखर वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon