मंद्रूप पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनची गाडी शेताच्या बांधावर नेल्याची घटना मागील महिन्यात उघडकीस आली होती
इन्व्हर्टर-बॅटरीही गायब – बदलीनंतर रातोरात परत आणल्याचा धक्कादायक आरोप तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आला होता..

मंद्रूप पोलीस ठाण्यातील या धक्कादायक प्रकाराची वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे केली होती..
दक्षिण सोलापूर: पोलीस ठाणे म्हणजे कायद्याचे रक्षक, मात्र याच ठाण्यातील शासकीय साहित्याचीच तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी या अधिकाऱ्याने परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक आरोप मागील महिन्यात समोर आला आहे होता, तत्कालीन पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी या अधिकाऱ्याने मंद्रूप पोलीस ठाण्यात असलेली बेवारस गुन्ह्यातील एचएफ डीलक्स ही गाडी उचलून थेट आपल्या शेतातील गड्याला (नोकराला) वापरण्यासाठी दिली होती. एवढेच नाही तर, पोलीस स्टेशनमधील इन्व्हर्टर बॅटरीही त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी उचलून नेली होती.

हा प्रकार सुरू असताना संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली. बदली झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस येण्याची भीती वाटल्याने, रात्रीच्या अंधारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती गाडी आणि इन्व्हर्टर-बॅटरी पुन्हा पोलीस ठाण्यात आणून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता,

सरकारी मालमत्तेचा अशा प्रकारे वैयक्तिक वापर करणे हा गंभीर गैरप्रकार आहे. यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला डाग लागत आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून आणि सामाजिक कार्यकर्त्याकडून करण्यात आली होती,

संबंधित चोरीची घटना उघडकीस येऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडून अद्याप पर्यंत कोणतीही ठोस अशी कारवाई झालेली नाही व पोलीस ठाण्यातच चोरी करणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्यावर अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका ही चोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याची असल्याची चर्चा परिसरात होत आहे, वरिष्ठांची भूमिका ही संशयास्पद वाटत आहे…

एखाद्या सामान्य नागरिकाने जर पोलीस स्टेशन मध्ये चोरी केली असती तर पोलिसांनी तेव्हाच त्याच्यावर गुन्हा दाखल केला असता, परंतु सदरील चोरीच्या प्रकरणात मंद्रूपचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांचेच नाव समोर आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करत नाहीत का ? पोलिसांना वेगळा कायदा आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..?




