मंद्रूप येथे शेतकरी संवाद बैठक

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

शेतकऱ्यांच्या समस्या उपाय आणि पुढील दिशा जाणून घेतल्या..

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे शेतकरी बांधवांसोबत बैठकीत सध्याच्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊस पिकाची वाढ, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी-चारा आणि उपलब्ध पाणीसाठा जूनपर्यंत पुरविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी आणि सूचनाही यावेळी जाणून घेतल्या.

दर चार-पाच वर्षांनी निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा केवळ त्या वर्षापुरता सामना न करता पुढच्या काळाचा विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे. शेततळी, जलसंधारण, पावसाचे पाणी अडवणे-जिरवणे, ठिबक सिंचनाचा वापर आणि जनावरांसाठी चारा-पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था यावर अधिक भर द्यावा लागेल. चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचनांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

दुष्काळासोबतच आपल्या भागातील शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. प्रत्येक मराठी शाळेतील शिक्षणाचा दर्जा चांगला व्हावा, स्थानिक उद्योग आणि शेतीपूरक व्यवसाय वाढावेत, महिला व युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे. ‘पाऊस कमी झाला तर पुढे काय?’ याचे उत्तर आजपासून शोधले पाहिजे, हीच या बैठकीतून स्पष्ट झालेली भूमिका आहे.

मंद्रूप येथील शेतकरी बांधवांनी मांडलेले प्रश्न आणि सूचना पुढील नियोजनासाठी महत्त्वाच्या आहेत. पाणी, शेती, शिक्षण, उद्योग आणि रोजगार या सर्व विषयांकडे एकत्रितपणे पाहून व्यवहार्य आणि टिकाऊ उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon