मुख्यमंत्र्यांचा दौरा दुष्काळी पाहणी दौरा कसं म्हणावं हेच कळना – छावा संघटना

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मुख्यमंत्र्यांच्या सोलापुरातील दुष्काळी दौऱ्यावर अनेक राजकीय पक्षाकडून आणि सामाजिक संघटने कडून वेगवेगळे आरोप आणि टीका केली जात आहे, मुख्यमंत्र्यांचा दौरा दुष्काळी दौरा नसून तो फक्त एक इव्हेंट होता आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यासाठी , आणि फक्त वेळ मारून नेण्यासाठी हा  दिखावा केला गेला आहे, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही, अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी हा दौरा केला असल्याचा आरोप उत्तरचे छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष  रतिकांत पाटील यांनी केला आहे,


1.शेतकऱ्यांची एवढी भीती कशाची कि ज्या शेतात मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी येणार आहेत म्हणून शेतकऱ्यांची मेटल डिटेकटर ने तपासणी करावी लागली असेल..


2…दुष्काळ पाहणी दौऱ्यात एवढे दोरखंड आडवे लावून मुख्यमंत्र्यांना इतकी कडक सुरक्षा का करावी वाटली.. शेतकऱ्यांची एवढी भीती वाटतेय तर बांधावर आला नसता तरी चाललं असतं…


फोटो 3 = शेतात लांब जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी करपलेले पीक टेबलवर आणून ठेवणे हा कसला पाहणी दौरा..


फोटो 4= तो कोणता दीड शहाणा अधिकारी होता कि ज्याने हिरवळीच्या बांधावर उभा राहून दुष्काळी पाहणी दौरा आयोजित केला आहे..?


फोटो 5 = पिके जळाली सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी, आणि मुख्यमंत्री महोदय पाहतात उसाच पाचट..

असे अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत कि ज्यामध्ये दुष्काळी पाहणी दौरा आहे कि एखादा इव्हेट होता हेच कळत नसल्याने हा मुख्यमंत्र्यांचा फक्त दिखावा असल्याचा आरोप छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष रतिकांत पाटील यांनी केला आहे..

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon