मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची एवढी भीती का ? कैलास पाटील..

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

दुष्काळाची पाहणी करायला आलात; पण शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारायलाही वेळ नाही का ?

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. माझ्या मतदार संघातील मलकापूर येथे त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी आम्ही उपस्थित होतो. मात्र, आम्हाला दोरखंड लावून मुख्यमंत्र्यांपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे, निवेदन स्वीकारण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला नाही. फक्त पाहणीचा सोपस्कार उरकून मुख्यमंत्री निघून गेले..

मुख्यमंत्री महोदय, शेतकरी तुमचा शत्रू नाही; तो या राज्याचा अन्नदाता आहे. त्याच्या हातातील निवेदनापासून सरकार एवढे अंतर का ठेवत आहे? आणि दोरखंड लावून शेतकऱ्यांना दूर ठेवून त्यांच्या समस्या सुटणार आहेत का? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon