मंद्रूप पोलीस ठाण्याचीच चोरी ? वरिष्ठांकडे चौकशीची मागणी..

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

तत्कालीन अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनची गाडी शेताच्या बांधावर नेली,

इन्व्हर्टर-बॅटरीही गायब – बदलीनंतर रातोरात परत आणल्याचा धक्कादायक आरोप!”

मंद्रूप पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार; वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी

दक्षिण सोलापूर: पोलीस ठाणे म्हणजे कायद्याचे रक्षक, मात्र याच ठाण्यातील शासकीय साहित्याचीच तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.
तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने मंद्रूप पोलीस ठाण्यात असलेली बेवारस गुन्ह्यातील गाडी उचलून थेट आपल्या शेतातील गड्याला (नोकराला) वापरण्यासाठी दिली होती. एवढेच नाही तर, पोलीस स्टेशनमधील इन्व्हर्टर बॅटरीही त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी उचलून नेली होती.


हा प्रकार सुरू असताना संबंधित अधिकाऱ्याची बदली झाली. बदली झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस येण्याची भीती वाटल्याने, रात्रीच्या अंधारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती गाडी आणि इन्व्हर्टर-बॅटरी पुन्हा पोलीस ठाण्यात आणून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

सरकारी मालमत्तेचा अशा प्रकारे वैयक्तिक वापर करणे हा गंभीर गैरप्रकार आहे. यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला डाग लागत आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon