मंद्रूपमध्ये वैभव ट्रेडर्सचा शुभारंभ – विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मंद्रूप..
तरूणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वावलंबी जीवन जगण्यासाठी उद्योगाला प्राधान्य द्यावे. राजकारण व नोकरीच्या पाठीमागे न लागता समाजाच्या गरजेनुसार उद्योग निवडून यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन एमके फाउंडेशनचे अध्यक्ष, समाजसेवक व सागर सिमेंटचे महादेव कोगनूरे यांनी केले. मंद्रूप येथील विजयकुमार घाले यांच्या वैभव ट्रेडर्सचे शुभारंभ कोगनूरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य मळसिध्द मुगळे, माजी सभापती अप्पाराव कोरे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष प्रशांत कडते, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे , गोविंद पाचवे, सुरेश स्वामी, शिवराज कालदे , अॅड. नागेश मेंडगुदले, ग्रामपंचायत अधिकारी प्रविणकुमार घाडगे, सिध्दलिंग म्हेत्रे, रमेश कट्टीमनी, चंद्रकांत ख्याडे, मळसिध्द घाले, मनोज पाचवे, शिवानंद माळी , गुरूनाथ जोडमोटे, निंगप्पा कुमठेकर, प्रदीप ख्याडे, दयानंद देवमाने, सागर घाले आदी उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजयकुमार घाले व घाले परीवाराला नवीन व्यवसाया निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हाळप्पा घाले, चिदानंद घाले, निंगप्पा ख्याडे, केदार घाले, वैभव घाले , विशाल घाले, मल्लिनाथ घाले व जाकीर शेख आदींनी परीश्रम घेतला.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon