सोलापूर आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी मोनिका सरकार पवार यांची निवड

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

सोलापूर : आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील मोनिका सरकार पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटनेचा विस्तार करताना महिला शक्तीला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेशात तसेच सोलापूर शहरात संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्ताराचे काम वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील महिला आघाडी अधिक सक्षम करून महिलांना पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मोनिका सरकार पवार यांच्यावर महिला आघाडी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


मोनिका पवार यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे प्रभारी प्रकाशची जरवाल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे, प्रदेश संघटक सागर पाटील तसेच सोलापूर शहराध्यक्ष निलेश संगेपान यांनी माहिती देत त्यांचे अभिनंदन केले.
या निवडीमुळे सोलापूर शहरात आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शहरातील महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून त्यांना संघटित करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोनिका पवार सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
मोनिका सरकार पवार यांच्या निवडीबद्दल सोलापूर शहरातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon