*मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजींच्या सानिध्यात शिवमहापुराण कथेचे उद्घाटन*

आषाढ मासनिमित्त श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, सोलापूर यांच्या माध्यमातून व एस. एस. साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय शिवमहापुराण कथेला उपस्थित राहून, ष.ब्र.108 स्वरसम्राट श्री. अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्य वाणीतून कथा वाचन ऐकण्याचे भाग्य लाभले.
ज्ञानसिंहासन काशीपीठाचे जगद्गुरू १००८ श्री श्री श्री डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात या शिवमहापुराण कथेचे उद्घाटन संपन्न झाले होते.
याप्रसंगी ह.भ.प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच राज्यसभा खासदार श्री अजितजी गोपछडे साहेब, माजी मंत्री श्री सिद्धराम मेहत्रेजी, श्री शिवयोग शास्त्री होळीमठ, श्री बसवराज शास्त्री पुराणिक, श्री इरण्णा मठपती, श्री प्रशांत स्वामी, श्री रतिकांत स्वामी, श्री ऋषिकेश स्वामी, डॉ. शैलेष पाटील, डॉ. सिद्धय्या स्वामी, डॉ. श्री. शिवयोगी होळीमठ, श्री प्रकाश आष्टे, श्री दिलीप भालेराव तसेच अनेक मान्यवर आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
