व्यावहारीक ज्ञान प्राप्ती: पालकांकडून मोठी खरेदी
द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
दौंड येथील नवयुग प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्मानीय श्री अजिंक्यजी येळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. गुरुमुख (दादा ) नारंग हे होते. दौंड तहसील च्या निवासी नायब तहसीलदार श्रीमती ममता भंडारे मॅडम तसेच दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष दीपक भाऊ सोनवणे तसेच सोनवडी केंद्राचे केंद्र समन्वयक विजय कारखेले सर, पंचायत समितीचे प्रफुल्ल जगताप साहेब, स्व. ला.भा. गॅरेला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब वागस्कर सर, पर्यवेक्षक श्री. विजय वाघ सर यांसह परिसरातील बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केली यावेळी उपस्थित मान्यवरांना संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने सन्मानीत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवयुग प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप मांडे सर यांनी केले. याप्रसंगी नवयुग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुमुख दादा नारंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनातील अनेक उदाहरणे देऊन व्यावहारिक ज्ञान हे विद्यार्थ्यांना भविष्यात कशाप्रकारे उपयोगी पडेल ते सांगितले. तसेच ममता भंडारे मॅडम, अजिंक्यजी येळे साहेब, दीपक भाऊ सोनवणे आदी मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व या उपक्रमाचे कौतुक केले. याच कार्यक्रमाप्रसंगी नुकत्याच झालेल्या क्रीडा सप्ताहात गट एक ते चार व गट पाच ते सात या दोन गटात क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या होत्या . त्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर “मुख्यमंत्री, माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी बोलक्या चार भिंतीच्या वर्ग खोलीचे उद्घाटन गटविकास अधिकारी अजिंक्यजी येळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या आनंद मेळाव्याचा उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व पालक यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज सोनवणे यांनी तर अनुमोदन अशोक गिरमकर यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार संतोष गवळी यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीम. रूपाली निडोनी मॅडम, श्रीम. श्रुंखला वडवेराव मॅडम, श्रीम. लता चितळे मॅडम, श्रीम. प्रगती बंगाळे मॅडम, नफिसा शेख मॅडम या शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले.