द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
दौंड -पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड प्रशालेत संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दौंड बार असोसिएशनचे सदस्य श्री ओंकार बी. देसाई (बी.ए .एल.एल.बी) यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली.
प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान दिन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी संविधान राज्यघटनेचा मसुदा व स्वातंत्र्य -समता -बंधुता यावर सखोल मार्गदर्शन केले तसेच संविधानाच्या काही कलमा बद्दल माहिती देऊन संपूर्ण देशाला संविधानाची अत्यंत गरज आहे हेही सांगितले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कणसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले संविधानामुळे भारत देश सुरक्षित आहे तसेच संविधानामुळेच देशाचा विकास व एकता टिकून आहे असेही प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा मनोडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनू पवार मॅडम यांनी केले. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . स्वाती कणसे मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . स्वाती कणसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.